Ad will apear here
Next
नाटक : उमल आणि उमज
मराठी रंगभूमीला मोठा इतिहास आहे. संगीत नाटकापासून सामाजिक भान ठेवणारे, राजकीय अंगाने जाणारे, विनोदाचे वैविध्य दाखवणारे, इतिहासात डोकावून पाहणारे, वास्तवतेचे भान देणारे अशी अनेक नाटके दिग्गज रंगकर्मींच्या लेखणीतून, दिग्दर्शक, अभिनय, नेपथ्यातून वाचकांच्या भेटीस आली आहेत, येत आहेत. नाटकांचे दस्तऐवज ठरणारी स्मरणिका ‘रंगगंध’ने काढली होती. ती आता ‘नाटक : उमल आणि उमज’ या पुस्तकातून जतन करण्यात आली आहे. याचे संपादन डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी केले आहे.

यामध्ये नाटक सादर होताना संहिता लेखनापासून सादर करायच्या सर्व पैलूंवर नाट्यकलावंतांचे लेख आहेत. रत्नाकर मतकरी यांनी नाटकाच्या जन्माची कथा, चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटक उभे कसे करावे, डॉ. गिरीश ओक यांनी नाटकाचे अभिवाचन, तर आनंद अभ्यंकर यांनी नाटक फुलवावे कसे, याबद्दल सांगितले आहे. नाटकातील संगीत, नेपथ्य, नाटक चालवावे कसे, याबरोबरच नाटक बघण्याच्या कलेविषयी यात मार्गदर्शन केले आहे. रंगगंध कलासक्त न्यास ही कला संस्था व राज्य नाट्य स्पर्धेच्या आठवणीही यात आहेत. यातील छोटेखानी लेख माहितीपूर्ण आहेत.   

पुस्तक : नाटक : उमल आणि उमज
लेखक : डॉ. मुकुंद करंबेळकर
प्रकाशक : अक्षर मानव प्रकाशन
पाने : ७२ 
किंमत : १२० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZHYCB
 Critical study of this important medium -- of the Medium . Of its format .
components , changing patters , regional variations ,evolution , and
such relevant aspects . Very timely and , therefore , historical
as well .
Similar Posts
वसंत कानेटकर, माधव मनोहर अनेक अभिनेत्यांना ज्यांच्या नाटकांमुळे विशेष ओळख मिळाली असे अग्रगण्य नाटककार आणि लेखक वसंत कानेटकर आणि ज्यांच्या समीक्षेतून योग्य मूल्यमापन होईल असा विश्वास भल्या भल्या अभिनेत्यांना वाटायचा, असे थोर नाट्यसमीक्षक माधव मनोहर यांचा २० मार्च हा जन्मदिन. आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
लीलावती भागवत, कविता महाजन बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘मुलगी झाली हो!’ नाट्याचा प्रयोग पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकायत सामाजिक संस्था आणि मराठी विभाग यांच्या वतीने ज्योती म्हापसेकर लिखित ‘मुलगी झाली हो!’ या नाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
‘स्वातंत्र्यवीरायण’च्या सादरीकरणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : ‘स्वातंत्र्यवीरायण’ या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनगाथेवरील नाटकाचे पुण्यातील युवा रंगकर्मींनी केलेले सादरीकरण नुकतेच पार पडले. या सादरीकरणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध युवा कलाकार अथर्व कर्वे याने दिग्दर्शित केलेल्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग भरत नाट्य मंदिर येथे नुकताच झाला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language